पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग/पापु-10
“जल जीवन मिशन” कार्यक्रमाच्या अनुषंगाने संभाव्य मुद्द्यांबाबत टिपणी
केंद्र शासन पुरस्कृत महत्वाकांक्षी जल जीवन मिशन कार्यक्रमाची सन 2019 मध्ये सुरवात करण्यात आली असून त्याद्वारे सन 2024 पर्यंत सर्व 100 टक्के ग्रामीण कुटुंबांना “हर घर नल से जल” या तत्वाने कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC-Functional Household Tap Connection) द्वारे शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबद्ध आहे. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण व शाश्वत पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
दि. 05/07/2023 रोजीच्या सद्यस्थितीनुसार राज्यातील ग्रामीण भागातील एकुण 1,46,73,257 घरे/कुटुंबांपैकी 1,13,06,671 (77.06%) इतक्या घरांना/कुटुंबांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC-Functional Household Tap Connection) देण्यात आलेली आहे.
सन 2023-24 च्या जल जीवन मिशन वार्षिक कृती आराखड्यानुसार चालु वर्षात राज्यात अंदाजे 32.14 लाख (FHTC-Functional Household Tap Connection) जोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, उर्वरीत नळ जोडण्या डिसेंबर 2024 अखेर देण्यात येऊन राज्यात 100 टक्के नळजोडण्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजन आहे. सन 2023-24 च्या उद्दिष्टापैकी दि. 05/07/2023 रोजी अखेरपर्यंत इतक्या 3,15,026 घरांना/कुटुंबांना नळ जोडणी (FHTC) देण्यात आलेली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एकुण रू. 50,579.46 कोटी इतक्या रक्कमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला असुन त्यांतर्गत केंद्र हिस्श्याचा निधी रु. 24,178.01 कोटी व राज्य हिस्स्याचा निधी रू. 23,656.54 कोटी इतका आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात केंद्र व राज्य हिस्स्याचा मिळुन एकुण रु. 8462.08 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यापैकी, राज्य हिस्स्याचा निधी रु. 3333.08 कोटी इतका आहे.
सन 2022-23 वर्षात राज्यातील एकूण 8,22,396 इतक्या घरांना/कुटुंबांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC-Functional Household Tap Connection) देण्यात आले. तसेच, जल जीवन मिशन कार्यक्रमाकरीता सन 2022-23 आर्थिक वर्षात एकुण रु. 6081.97 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला आहे.
राज्याच्या एकत्रीत कृती आराखड्यानुसार (Saturation Plan) जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यात एकूण 34747 योजना घेण्यात आल्या आहेत. सदर योजना जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत आहेत. सदर योजनांच्या प्रगतीची दि. 05.07.2023 रोजीची सद्यस्थिती पुढील प्रमाणे आहे :-
जिल्हा परिषदमार्फ़त राबविण्यात येणा-या योजना :-
Saturation Plan नुसार
योजनांची संख्या
|
अंदाजपत्रक
तयार
|
तांत्रिक मंजुरी प्रदान
|
प्रशासकीय
मंजुरी प्रदान
|
निविदा प्रसिद्ध
|
33818
|
33818
(100%)
|
33818
(100%)
|
33818
(100%)
|
33818
(100%)
|
कार्यारंभ आदेश प्रदान
|
कामे सुरू
|
कामे पुर्ण
|
अद्याप सुरू न
झालेली कामे
|
33818
(100%)
|
30194
|
3315
|
109
|
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फ़त राबविण्यात येणा-या योजना:-
Saturation Plan नुसार
योजनांची संख्या
|
अंदाजपत्रक
तयार
|
तांत्रिक मंजुरी प्रदान
|
प्रशासकीय
मंजुरी प्रदान
|
निविदा
प्रसिद्ध
|
कार्यारंभ आदेश प्रदान
|
929
|
929
(100%)
|
929
(100%)
|
929
(100%)
|
929
(100%)
|
929
(100%)
|
जल जीवन मिशन अंतर्गत विविध घटकांतर्गत राज्याची प्रगती खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र.
|
बाब
|
उद्दीष्ट
|
साध्य
|
टक्केवारी
|
1.
|
कार्यात्मक घरगुती नळ जोडणी
|
1,46,73,276
|
1,13,06,671
(दि. 05.07.2023 च्या सद्यस्थितीनुसार)
|
(77.06%)
|
2.
|
हर घर जल गावे (प्रमाणित)
|
40327
|
1288
|
3.19 %
|
3.
|
गाव कृती आराखडा (VAP)
|
40327
|
40294
|
99.92%
|
4.
|
गाव पाणी व स्वच्छता समिती
(VWSC)
|
40327
|
40297
|
99.93%
|
5.
|
जिल्हा कृती आराखडे (DAP)
|
34
|
34
|
100%
|
6.
|
शाळा नळ जोडणी
|
78102
|
76694
|
98.20%
|
7.
|
अंगणवाडी नळ जोडणी
|
91208
|
87720
|
96.18 %
|