प्रधान मंञी मातृ वंदना योजना
प्रधान मंञी मातृ वंदना योजना - १.० प्रस्तावना (कालावधी जानेवारी २०१७ ते मार्च २०२३)
भारतातील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्या पर्यंत शारीरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्य दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दि.1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना कार्यान्वित करण्यात आली असून दिनांक 12.8.17 नुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यात प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. सदर योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने राबविण्यात येत असून या योजनेत केंद्र शासनाचा 60% राज्य शासनाचा 40% सहभाग आहे. केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सुचना, निकष, कार्यपध्दती व विकसीत केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे मार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. सबब त्यांना या योजनेसाठी राज्यस्तरीय समन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दिनांक 8.12.2017 रोजीच्या शासन निर्णया नुसार लाभाची रक्कम लाभार्थी माहिलेच्या आधार संलग्न बॅंक खात्यात किंवा पोस्ट ऑफीस मधील खात्यात तीन हप्त्यामध्ये (DBT) मार्फत थेट जमा केली जात आहे.
सदर योजना चालु झाल्यापासून ते माहे मार्च २०२३ पर्यंत लाभ देण्यात आलेले लाभार्थि संख्या व वितरित करण्यात आलेले अनुदान.
वर्ष
|
केंद्र शासना मार्फत देण्यात आलेले
उद्दीष्ट
|
लाभार्थी
|
टक्केवारी
|
खर्च
(
रु.हजारात
)
|
2017-2018
|
417185
|
319567
|
77
|
388692
|
2018-2019
|
662377
|
645660
|
97
|
2203022
|
2019-2020
|
604553
|
762358
|
126
|
3819055
|
2020-2021
|
452436
|
547267
|
121
|
2639061
|
2021-2022
|
452436
|
610055
|
135
|
2484253
|
2022-2023
(२८ मार्च २०२३ अखेर )
|
452436
|
524542
|
116
|
2500963
|
Total
|
3041423
|
3409449
|
112
|
14035046
|
प्रधान मंञी मातृ वंदना योजना - २.० प्रस्तावना
केंद्र शासनाचे महिला व बाल विकास मंत्रालय, दिल्ली यांचे दि.१४ जुलै २०२२ रोजीच्या “मिशन शक्ती” मार्गदर्शक सुचनानुसार मिशन शक्ती अंतर्गत “सामर्थ्य” या विभागात एकूण ०६ योजना असून सदर योजनेमध्ये प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सदर योजनेच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार सदर योजनेतंर्गत पहिल्या अपत्यासाठी दोन टप्पयात रु.५०००/-चा लाभ व दुसरे अपत्य मुलगी असल्यासच दुस-या अपत्यासाठी रु. ६०००/-चा लाभ बाळाच्या जन्मानंतर एका टप्प्यात लाभार्थींस आधार संलग्न बॅक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT) व्दारे अदा करण्यात येणार आहे. सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी आणि स्ञी भ्रूणहत्या रोखण्यासाठी योगदान ठरेल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १.० आणि नविन २.० मधील झालेले बदल पुढील प्रमाणे आहेत.
अ .क्र
|
(PMMVY) (1.0)
|
(PMMVY) (2.0)
|
१)
|
लाभार्थीला लाभ कुटुंबातील प्रथम जिवंत अपत्यापुरताच होता.
|
पहिले अपत्य झाल्यास रु.५०००/-
दुसरे अपत्य मुलगी झाल्यास रु.६०००/-
|
२)
|
कुटुंबातील पहिले जिवंत अपत्य मुलगा अथवा मुलगी असल्यास तीन
हप्त्यात रु.५०००/- लाभ देय होता.
|
पहिल्या अपत्यासाठी दोन हप्त्यात रु.५०००/-चा लाभ आणि दुस-या
वेळी मुलगी जन्मल्यास एकाच टप्प्यात रु.६०००/-चा लाभ
देण्यात येणार आहे.
|
३)
|
लाभार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे निकष निर्धारित केलेले
नव्हते. म्हणजे कोणत्याही सामाजिक प्रवर्गातील घटक, गरीब
श्रीमंत पहिल्या अपत्याकरिता या योजनेचा लाभ घेऊ शकत होते.
|
ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न रु. ८ लाख पेक्षा कमी
आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येतो.
|
4)
|
लाभार्थीचा गर्भपात झाल्यास पुढील गर्भधारणेच्या वेळी उर्वरित
टप्प्यांचा लाभ देण्यात येत होता.
|
लाभार्थीचा गर्भपात अथवा उपजत मृत्यू झाल्यास लाभार्थीला
भविष्यातील गर्भधारणेमध्ये नवीन लाभार्थी म्हणून मानले
जाऊन पुर्ण लाभ दिला जाईल.
|
5)
|
लाभाकरिता पात्र लाभार्थीला वयाची अट नव्हती
|
लाभाकरिता पात्र लाभार्थीला किमान १८ व कमाल ५५ वर्षे वयाची अट
आहे. (निश्चित मार्गदर्शक सूचना नाहीत परंतु संगणक प्रणाली
मध्ये हि मर्यादा घातलेली आहे.)
|
6)
|
लाभार्थीला आधारकार्ड नसेल तरी पर्यायी कागदपत्रांच्या आधारे
पहिले दोन हप्ते म्हणजे रु.३०००/- मिळू शकत होते.
|
आधार क्रमांक किंवा आधार नसेल तर इनरोलमेंट आयडी व अन्य फोटो
ओळखपत्र देणे बंधनकारक आहे.
|
7)
|
लाभार्थीच्या पतीचे ओळखपत्राची / आधार कार्ड ची आवश्यकता होती
|
आता लाभार्थीच्या पतीच्या ओळखपत्राची/आधारकार्ड ची आवश्यकता
नाही
|
8)
|
पाञ लाभार्थीच्या अर्जाची पोर्टलला नोंदणी केल्यानंतर मंजुरी
(अप्रुवल) अधिकारी तालुका वैदयकिय अधिकारी (ग्रामीण),
वैदयकिय आरोग्य अधिकारी (महानगर), मुख्याधिकारी
(नगरपालिका) स्तरावर एकमेव मंजुरी (अप्रुवल) दिली जात होती.
|
पाञ लाभार्थीच्या अर्जाची पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर आरोग्य
सेविका मार्फत प्रथम सत्यापित (व्हेरिफिकेशन) करण्यासाठी व
व्दितीय मंजुरी (अप्रुवल) अधिकारी स्तरावर दिले जाईल.
|
9)
|
जुन्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पोर्टल मध्ये नोंदणी
तालुका किंवा प्रा. आ. केंद्र स्तरावर करण्यात येत होती.
|
नवीन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पोर्टल मध्ये स्वतः
लाभार्थी, आशा, आरोग्य सेविका नोंदणी करु शकतात.
|
10)
|
पुर्वी शासकीय आरोग्य संस्थेत गरोदर पणाची नोंदणी करुन
शासनाच्या आरसीएच पोर्टल वर नोंदणी केल्याचा लाभार्थी
क्रमांक नसला तरी फॉर्म भरला जात असे.
|
आता शासनाच्या आरसीएच पोर्टल वर नोंदणी केल्याचा लाभार्थी
क्रमांक असणे आवश्यक आहे.
|
11)
|
पुर्वी मोबाईल क्रमांक नसला तरी फॉर्म भरला जात असे.
|
आता मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
|
>> केंद्रीय सचिव, महिला व बाल विकास विभाग मंत्रालय, नवी दिल्ली यांचे दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पञान्वये प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांनी समन्वयाने निर्णय घ्यावयाचा असल्याबाबत नमुद केले आहे.
भारत सरकार, महिला एवं बाल विकास मंञालय यांचे दि.15/०3/२०23 च्या पत्रानुसार दि. ३१ मार्च २०२३ पुर्वी राज्यस्तरावर कार्यरत एस्क्रो खाते बंद करण्याबाबत सूचित केले आहे. तसेच उपलब्ध निधी राज्यस्तरा वरील SNA खात्यात वर्ग करुन बॅक खाते बंद करणेबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच माहे 1 एप्रिल २०23 पासून प्रशासकीय निधी हा मिशन शक्ती अंतर्गत स्थापित महिला सक्षमीकरण हब मध्ये देण्यात येणार असे नमुद केले आहे.