कामगार आणि कामगार कल्याण
शिल्प कारागीर प्रशिक्षण कार्यक्रम :-
कौशल्य व ज्ञान देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे घटक आहेत. कामगारांच्या कौशल्य क्षमतेनुसार देशाची आर्थिक स्थिती जास्त उत्पादनशिल नाविन्यपूर्ण स्पर्धात्मक होते. वेगवेगळे रोजगार व त्यांचे स्तर रोजगार क्षमतेत वाढ, रोजगाराच्या नवीन संधी हे आर्थिक विकासाचे केंद्र आहे. यासाठी शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजना या योजनेची कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मितीची योजना व त्यात जागतिक स्तरावर लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी 11 व्या पंचवार्षिक योजनेत अधिक भर देण्यात आलेला आहे. यासाठी मा.पंतप्रधान व मा.केंद्रीय वित्त मंत्री यांनी जागतिक स्तरावर कौशल्य निर्मितीच्या तसेच असंघटीत क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षणाच्या विविध योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. शिल्प कारागिर प्रशिक्षण योजना यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. यामध्ये इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री, कर्मचारी यांचा अधिक खर्च आहे.