आदिवासी उपयोजना

सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी विकास विभाग अर्थसंकल्पीय तरतूद

आदिवासी विकास विभागास सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अनिवार्य खर्च अंतर्गत रु.335.0695 कोटी तरतुद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.

राज्याचे वार्षिक कार्यक्रम सन 2025-29 चे आकारमान एकूण रू.254560.00 कोटी इतके आहे. त्यापैकी कार्यक्रम खर्चाकरीता आदिवासी घटक कार्यक्रमास सन 2025-26 करीता नियोजन विभागाने रु.21495.00 कोटी नियतव्यय उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर नियतव्ययाचे एकूण राज्य आकारमानाशी प्रमाण 8.44 % इतके आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरीता रु.3240.00 कोटी, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेकरीता रु.1080.00 कोटी व घरकूल योजनेकरीता रु.1815.00 कोटी इतका नियतव्यय समाविष्ट करण्यात आला आहे.

प्राप्त झालेल्या नियतव्ययाचे वाटप करण्यासाठी मा.मंत्री (आदिवासी विकास) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयांनुसार जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमासाठी रु.2734.6927 कोटी (मुळ रू.2631.1556 + वाढीव रू.103.5371) तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली असून राज्यस्तरीय आदिवासी घटक कार्यक्रमासाठी रु.18760.3073 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत/केंद्र सहाय्यित योजनांच्या केंद्र हिश्श्याकरीता (shadow provision) रु.6031.2476 कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आलेली असून यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या योजनांकरीता रु.1390.0003 कोटी तर इतर प्रशासकीय विभागांच्या योजनांकरीता रु.4641.2473 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

उपरोक्तप्रमाणे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 202-25 या आर्थिक वर्षाकरिता कार्यक्रम खर्चाकरीता सद्यस्थितीत एकूण रू.27526.2476 कोटी तरतुद अर्थसंकल्पित करण्यात आलेली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या योजनांकरीता राज्यस्तरावरुन रु.9310.4050 कोटी व जिल्हा स्तरावरुन रु.607.20 कोटी अशी एकूण रु.9917.605 कोटी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.

यापैकी प्रमुख योजनांना खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे :-

(रू.कोटीत)
अ.क्र. योजना लेखाशिर्ष रक्कम
राज्यस्तर योजना
  महसूली योजना    
1 शासकीय आश्रमशाळा 2225 डी 734 2207.10
2 अनुदानित आश्रमशाळा 2225 एफ 129 1950.00
3 ग्रामीण रस्ते दुरूस्ती 3054 2722 200.00
4 शासकीय वसतीगृहे 2225 डी 725 523.80
6 नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील शिक्षण 2225 सी 999 230.00
5 मूल्यमापन व सनियंत्रण 2225एफ281 41.50
7 ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना 2225 डी 743 200.00
8 केंद्रवर्ती अर्थसंकल्प (Nuclues Budget) 2225 1704 50.00
9 पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजना 2225 ई 024 200.00
10 शासकीय आश्रमशाळा इमारत दुरूस्ती 20594683 75.00
11 शबरी आदिवासी विकास महामंडळास आर्थिक सहाय्य 2425 1359 54.30
12 आदिम जमाती विकास कार्यक्रम 2225 सी 885 100.00
13 राज्य लोकसेवा/ संघ लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण 2225 डी 387 100.00
14 पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती (राज्य हिस्सा 25%) 2225 डी 941 100.00
15 शिक्षण फी व परीक्षा फी 2225 एफ 094 100.00
16 वैद्यकीय व तत्सम महाविद्यालये फी प्रतिपूर्ती 2225 3529 70.00
17 योजनांची विविध माध्यमांमार्फत माहिती व प्रसिद्धी 2225 4113 70.00
18 आदिवासी विकास महामंडळ यांस सहाय्य 2425 0853 5.91
19 कौशल्य विकास योजना 2225 डी 262 100.00
20 शासकीय वसतीगृह इमारत दुरूस्ती 20594674 15.00
21 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी अधिछात्रवृत्ती 2225 एफ 773 47.00
22 परदेशी शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती 2225 4098 20.00
23 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे 22252658 50.00
  भांडवली योजना    
1 रस्ते विकास (बिरसा मुंडा रस्ते) 50545117 400.00
2 शासकीय आश्रमशाळा बांधकाम (टिएसपी 1186.86+ ओटीएसपी 400.00) 42251109/ 42251118 1580.86
3 शासकीय वसतीगृह बांधकाम (टिएसपी 112.00+ ओटीएसपी 390.00) 42251083/ 42251092 502.00
4 समाज मंदीर बांधकाम 42251154 2.00
5 संग्रहालय, सांस्कृतिक संकुले व संशोधन केंद्र स्थापना 42250443 40.00
6 कार्यालयीन इमारत बांधकाम 40590233 60.00
7 इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा बांधकाम 42250532 13.60
8 भूसंपादन 42250131 3.00
जिल्हास्तर योजना
1 सुवर्णमहोत्सवी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती   195.41
2 ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा   138.42
3 नाविन्यपूर्ण योजना   53.45
4 समाजमंदिर बांधकाम   56.15
5 कार्यालयीन इमारत दुरुस्ती   20.04
6 शासकीय निवासस्थान दुरुस्ती   16.62
7 स्वाभिमान सबलीकरण योजना   10.30
8 पारधी समाजाच्या विकासाकरीता विविध योजना   28.86
9 कन्यादान योजना   2.92

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त महत्वाच्या विकास क्षेत्रासाठी सन 2025-26 करीता करण्यात आलेल्या तरतुदी

  • आदिवासी विकास विभागामार्फत 497 शासकीय आश्रमशाळा, 556 अनुदानित आश्रमशाळा, 162 नामांकित शाळा, 490 शासकीय वसतीगृहे, स्वयंम योजनेंतर्गत अर्थसहाय्य, तसेच सैनिकी शाळा तुकडीला अर्थसहाय्य असे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. अशा शैक्षणिक उपक्रमांकरीता रु.5425.90 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रिय यंत्रणांचे बळकटीकरण, आदिवासी विकास महामंडळ सहाय्य, शबरी आदिवासी विकास महामंडळ सहाय्य या अंतर्गत क्षेत्रिय कार्यालयांच्या आस्थापनाविषयक बाबीकरीता रु.78.83 कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परिक्षा फी व शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, संशोधन अधिछात्रवृत्ती इ. बाबींकरीता रु.502.65 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • आदिवासी विकास विभागामार्फत लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, पोलीस / सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण अशा प्रशिक्षण कार्यक्रमांकरीता रु.101.00 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • आश्रमशाळा बांधकाम/ वसतीगृह बांधकाम/ इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा बांधकाम/ भुमिसंपादन/ कार्यालयीन इमारत बांधकाम/ समाज मंदीर बांधकाम अशा इमारत बांधकामविषयक योजनांकरिता रु.2207.46 कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5 टक्के अबंध निधी अर्थसहाय्य याकरीता रु.267.88 कोटीची तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत रु.200.00 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे. अशा रीतीने ग्रामपंचायत/ गावपाडे स्तरावरील मूलभूत सुविधा कामांकरीता सन 2025-26 या वर्षात रु.467.88 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी पंतप्रधान आवास योजनेखाली घरकुल योजनेसाठी राज्य हिश्श्यासाठी रू.2215.00 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत निकषात न बसणारे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून शबरी आदिवासी घरकुल (शहरी) योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी रु.50.00 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. अशी एकूण आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी एकूण रु. 2265.00 कोटी एवढी भरीव तरतूद राज्य नियतव्ययामधून अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • स्थानिक गरजेस अनुरुप आवश्यक योजना राबविण्यासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी रु.50 कोटी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.
  • आदिम जमाती विकास योजनेंतर्गत रु.100 कोटी तरतूद अर्थसंकल्पित आहे
  • रस्ते व पूल विकास शिर्षासाठी राज्यस्तरावरुन नवीन रस्त्यांसाठी रु.400.00 कोटी तर रस्ते सुधारणा व दुरुस्तीसाठी रु. 200.00 कोटी अशी एकूण रु.600.00 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा स्तरावरुन रू.281.80 कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे. अशी एकूण रस्तेविकास क्षेत्रासाठी रु.881.80 कोटी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता इतर प्रशासकीय विभागाच्या योजनांकरीता राज्य व जिल्हास्तरावर एकूण रू.11577.00 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित असून

त्यापैकी प्रमुख योजनांना खालीलप्रमाणे तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे.

(रु.कोटीमध्ये)

राज्यस्तरीय योजना रक्कम जिल्हास्तरीय योजना रक्कम
ग्रामविकास विभाग - रु.3040.97
पेसा ग्रामपंचायतींना 5 % अबंध निधी (पेसा कक्ष) 6.92 पेसा ग्रामपंचायतींना 5 % अबंध निधी 267.88
ग्रामीण जीवनोन्नती अभियान 100.00 यात्रास्थळांचा विकास 11.37
प्रधानमंत्री आवास योजना (राज्य हिस्सा) 2215.00 रस्ते विकास 281.80
पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान-पंच, सरपंच, सचिव, अशासकीय सदस्यांना प्रशिक्षण (राज्य हिस्सा ) 5.00    
पंडीत दीनदयाल घरकुल जागा खरेदी योजना 1.50    
महिला किसान सशक्तीकरण परियोजना 1.50    
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (आवास योजना-ग्रामीण) 150.00    
एकूण 2479.92   561.05
सार्वजनिक आरोग्य विभाग- रु.434.50 कोटी
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना 120.00 आदिवासी भागातील आरोग्य संस्थांची स्थापना/श्रेणीवाढ/ बळकटीकरण 27.68
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (राज्य हिस्सा) 150.00 संवेदनशील भागात फिरत्या पथकाद्वारे आरोग्य तपासणी (नवसंजीवनी) 71.46
प्रधानमंत्री आयुषमान भारत आरोग्य पायाभूत अभियान 3.00 राष्ट्रीय हिवताप निर्मूलन 9.36
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (राज्य हिस्सा ) 50.00    
राष्ट्रीय आयुष अभियान (राज्य हिस्सा ) 3.00    
एकूण 326.00   108.50
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - रु.803.00 कोटी
संजय गांधी निराधार अनुदान योजना 300.00    
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना 500.00    
वसतीगृहांना सहायक अनुदान 3.00    
एकूण 803.00    
उर्जा विभाग-रू.1746.34 कोटी
कृषिपंप ग्राहकांना वीज दरात सवलतीपोटी अनुदान 1380.00 वीज वितरण विषयक सुविधा पुरविणे वीज वितरण कंपनी मर्यादित यांना अनुदान 121.93
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांना अनुदान 50.00 मेडा संस्था/अपारंपारिक उर्जा विकास 44.41
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना 150.00    
एकूण 1580.00   166.34
महिला व बाल विकास विभाग - रु.3525.95 कोटी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3240.00 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आहार योजना 224.54
    अंगणवाडी बांधकाम 42.60
    महिला बालकल्याण समिती सहाय्य 18.21
    ग्राम बाल विकास केंद्र 0.60
  3240.00 एकूण 285.95
शालेय शिक्षण विभाग - रु.389.66 कोटी
आदिवासी क्षेत्रातील माध्यमिक शाळांना अनुदान 110.57 क्रिडा सुविधा उपलब्ध करुन देणे 35.95
उच्च माध्यमिक शाळांना अनुदान 6.96    
सैनिकी शाळांना अनुदान 35.75    
समग्र शिक्षा अभियान 110.00    
शालेय पोषण आहार योजना 60.00    
नव भारत साक्षरता कार्यक्रम (राज्य हिस्सा ) 0.43    
जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) 15.00    
राज्यात पीएम श्री शाळा विकसित करणे (उदयोन्मुख भारतासाठी प्रधानमंत्री शाळा) (राज्य हिस्सा ) 10.00    
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) 5.00    
एकूण 353.71   35.95
कृषि विभाग - रु.205.07 कोटी
कृषि विद्यापीठांना अनुदान 10.50 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 120.30
केंद्र योजनेंतर्गत कृषि उन्नती योजनेंतर्गत विविध कार्यक्रमांच्या समरूप राज्य हिश्श्यांकरीता 72.47 फळ रोपवाटिका 1.30
भाऊसाहेब फुंडकर योजना 0.50    
एकूण 83.47   121.60
जलसंधारण व मृद संधारण विभाग - रु.127.16 कोटी
आदिवासी क्षेत्रांतील लघुपाटबंधारे प्रकल्प (100 ते 250 हे.) 40.00 स्थानिक क्षेत्र लघुपाटबंधारे प्रकल्प (0 ते 100 हे.) 81.71
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (राज्य हिस्सा ) 5.00 मृद संधारण उपयोजना 0.45
एकूण 45.00   82.16
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग - रु.512.76 कोटी
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (राज्य हिस्सा) जलजीवन मिशन 400.00 नळाने पाणीपुरवठा 12.68
स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणे (राज्य हिस्सा) 50.00 आश्रमशाळांना पाणीपुरवठा 37.23
    विहीर व कूपनलिका 12.85
एकूण 450.00   62.76
वन विभाग - रु. 163.63 कोटी
केंद्र पुरस्कृत योजनांचे राज्य हिस्से 6.82 दगडी बांध 82.28
    पुर्नवनीकरण 14.88
    रोपवाटीका 1.17
    एकात्मिक जंगलविकास कार्यक्रम 19.25
    आगीपासून वनांचे संरक्षण 18.51
    गौण वनौपज विकास 6.07
    औद्योगिक/व्यापारी उपयोगासाठी वनझाडे लागवड 14.65
एकूण 6.82   156.81
कौशल्य विकास विभाग - रु. 50.96 कोटी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था- कारागीर व पर्यवेषक यांचे प्रशिक्षण विस्तार 1.23 औद्योगिक प्रशिक्षण संस्था विकास 38.63
    औद्योगिक प्रशिक्षण संस्था बांधकाम 10.71
    व्यावसायिक शिक्षण 0.39
एकूण 1.23   49.73
नगर विकास विभाग-रू. 43.18 कोटी
आदिवासी नागरी वस्ती सुधारणा कार्यक्रम 3.00 नगरोत्थान अभियान 37.18
नगरोत्थान अभियान 3.00    
एकूण 6.00   37.18
पशुसंवर्धन व मत्स्यविकास विभाग - रु. 76.98 कोटी
केंद्र पुरस्कृत योजनांचे राज्य हिस्से 4.51 पशुवैद्यकीय संस्था 21.04
    गायी-म्हशी वाटप 16.57
    शेळया-मेंढया जनावरे वाटप 9.85
    कुक्कुट पक्षी वाटप 4.25
    खाद्य / औषध पुरवठा 18.24
    मत्स्यविकास 2.52
एकूण 4.51   72.47
उद्योग विभाग - रु. 5.18 कोटी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 3.00 बीजभांडवलाकरीता अर्थसहाय्य 0.17
अनुसुचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना 1.00 उद्योजकता प्रशिक्षण 1.01
एकूण 4.00   1.18
गृहनिर्माण विभाग - रू. 40 कोटी
सर्वांसाठी गृहनिर्माण- अंमलबजावणी यंत्रणांना अनुदाने (प्रधानमंत्री आवास योजना) (राज्य हिस्सा) 40.00    
एकूण 40.00    
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग - रु.25.00 कोटी
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 25.00    
एकूण 25.00