शाळा व्र्यवस्थापन समिती
शाळा व्र्यवस्थापनसमिती
- आश्रमशाळांमधील दैनंदिन व्यवस्थापन व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच त्यावर संनियत्रण ठेवण्यासाठी आश्रमशाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांची दि.29/7/2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापना करण्यात आली.
- सदर समिती किमान 12 ते 16 लोकांची राहील. (सदस्य सचिव वगळून)
- अध्यक्षासहीत 75 टक्के सदस्य विद्यार्थ्यांचे आईवडील/पालकांमधून निवडले आहेत. सदर सदस्यांपैकी 50 % सदस्य महिला राहतील.
- समितीचे कार्ये :- बालकांचा हक्क तसेच राज्य शासन, स्थानक प्राधिकरण, शाळा, माता, पिता आणि पालक यांची कर्तव्ये याविषयी परिसरातील जनतेला सोप्या व कल्पक मार्गाने माहिती देणे.
- अशैक्षणिक कर्तव्ये शिक्षकांवर लादली जात नाहीत याचे संनियंत्रण करणे.
- शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
- शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
- शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
- शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
- विद्यार्थ्यांच्या गैरहजर राहण्याच्या व गळतीच्या समस्यांवर उपाययोजना करणे.
- विद्यार्थी व पालकांची गाऱ्हाणी ऐकणे .
- कर्मचाऱ्यांच्या विनाकारण गैरहजर राहण्याच्या समस्यांवर उपाययोजना करणे.
- बालकांची 100 % पट नोंदणी करणे व 100 % उपस्थिती यामध्ये सातत्य राहील याची खातरजमा करणे.
- शाळा बाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाह आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
- आश्रमशाळा, वसतीगृह, कोठीगृह, स्वंयपाकगृह, भोजनकक्ष, सार्वजनिक हॉल, पाणी पुरवठा योजना, जलनि:सारण, विद्युत इत्यादीची किरकोळ दुरूस्ती करणे.
- शाळा परिसर सुशोभित करणे व स्वच्छता ठेवणे.
शाळा व्यवस्थापन समितीचे वित्तीय अधिकार : शाळा व्यवस्थापन समित्यांना किरकोळ दुरूस्त्यांसाठी रू.1.00 लक्ष पर्यंत निधी उपलब्ध करून आश्रमशाळांच्या देण्यात आला आहे.