वने

1. दगडी चेक डॅम बांधणे :-

पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविण्यासाठी भूगर्भातील दिवसेंदिवस खालावलेली पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी व वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याकरीता ही योजना राबविण्यात येते. सदर योजनेखाली सन 2023-24 करीता आदिवासी उपाययोजनेंतर्गत रु.1000.00 लक्ष इतका नियतव्यय राज्यस्तरावर अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

2. वनक्षेत्रामध्ये पर्यटन स्थळांचा विकास:-

आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्राबाहेरील वनविभागात असलेल्या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी सन 2023-24 करीता राज्यस्तरीय योजनांसाठी लाक्षणिक तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.