विद्युत विकास

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.

आदिवासी उपयोजना (विशेष कृती कार्यक्रम ):

1. नंदूरबार जिल्हयात विद्युतीकरण न झालेल्या वाडी/वस्त्यांचे विद्युतीकरण करणे.

नंदूरबार जिल्हयात विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सप्टेंबर 2012 पर्यन्त करण्यात आलेल्या कामांचा तपशिल खालीलप्रमाणे :

अ.क्र. विवरण एकक उद्दिष्टे साध्य
1 उच्चदाब वाहिनी किमी 367.7 68.38
2 लघुदाब वाहिनी किमी 392.62 191.96
3 63 केव्हीए रोहित्रे संख्या 206 105
4 गावे संख्या 22 11
5 वाडी/पाडे संख्या 216 170
6 33/11 केव्ही रोहित्राची क्षमता वाढविणे संख्या   3
7 उपकेंद्राचे आर ऍण्ड एम कामे संख्या   2

सदर कामांकरिता रु. 25.37 कोटी इतका खर्च झाला असून मार्च 2013 पर्यन्त रु. 10.38 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. वर्ष 2011-12 करिता महाराष्ट्र शासनाने रु. 20.66 कोटी मंजूर केले असून त्यापैकी रु. 10.33 कोटी महावितरण कंपनीस अदा करण्यात आले आहेत. पैकी रु. 7.5 कोटीच्या कामांचे आदेश देण्यात आले असून त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. विवरण एकक उद्दिष्टे
़1 उच्चदाब वाहिनी किमी 80.40
2 लघुदाब वाहिनी किमी 162.50
3 63 केव्हीए रोहित्रे संख्या 58
4 गावे संख्या 1
5 वाडी/पाडे संख्या 59

अपारंपारिक उर्जा साधने

आदिवासी उपयोजना कार्यक्रम

  • नित्यनुतनशील उर्जा कार्यक्रम
महाराष्ट्रातील आदिवासी भागात आदिवासी जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत अपारंपारिक उर्जा विषयक योजना राबविल्या जातात. त्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाउर्जास निधी उपलब्ध करुन दिला जातो. राज्यातील आदिवासी जिल्हयात उपलब्ध निधीनुसार विविध उर्जा विषयक योजना राबविल्या जातात. या विकास कामासाठी रुपये 500.00 लाखाची तरतूद वित्तीय वर्ष 2014-15 मध्ये अपारंपारिक व नित्यनुतनशील उर्जा कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे.

  • ग्रामीण विद्युतीकरण योजना
केंद्र शासनाच्या धोरणानुसार सेन्सस क्रमांक असलेल्या व विद्युतीकरण न झालेल्या सर्व अति दुर्गम गावे/वाडया/वस्त्यांपैकी 300 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांचे/वाडयांचे/पाडयांचे विद्युतीकरण होऊ शकणार नाही. मात्र अशा गावांची विद्युतीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून अशा गावांचे सर्वेक्षण करुन 300 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे/वाडया/पाडे वस्त्या या ठिकाणी सदरची योजना राबविण्याचे उद्दिष्ट आहे. वित्तवर्ष 2014-15 मध्ये 31 गावे व 37 पाडयांमध्ये सदरची योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.
  • िविध आश्रमशाळांमध्ये सपवन सौर संकरित संयंत्र आस्थापित करणे :
राज्यातील आदिवासी व दुर्गम क्षेत्रात शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहे आहेत. आदिवासी व दुर्गम भागात भारनियमनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होता. त्यावर एक उपाय म्हणून ज्या ठिकाणी शक्य आहे. तेथील आश्रमशाळेत पवन सौर संकरित संयत्राव्दारे वीज निर्मिती करुन विजेची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी सदर योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येते. आश्रमशाळा व वसतिगृहामध्ये सदर योजना राबविण्याचे लक्ष्य आहे. वित्तवर्ष 2014-15 मध्ये 10 आश्रमशाळा/वसतीगृह /ग्रामीण रुग्णालयांमध्ये सदरची योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.
  • ग्रामपंचायतीसाठी ऊर्जा कार्यक्षम पथदिवे योजना
गावातील पथदिव्यांसाठी बहुतांश साध्या बल्बचा वापर करण्यात येतो. त्यासाठी 100 वॅटचे बल्ब बसविले जातात. साध्या बल्बची ऊर्जा कार्यक्षमता अत्यंत कमी असल्यामुळे विजेचा अपव्यय होत असतो. तसेच त्यांचे आयुष्यमानही कमी असल्याने वारंवार दिवे बदलावे लागतात. म्हणून ऊर्जा कार्यक्षम पथदिवे ही योजना घेण्यात आली असून त्यामुळे 80 टक्के पर्यन्त विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ऊर्जा वापर व खर्चामध्येही बचत होते. सदर योजनेतंर्गत वित्तवर्ष 2014-15 मध्ये 5,000 पथदिवे प्रस्तावित करण्यात आले आहेत.