परिवहन व दळणवळण

रस्ते विकास

आदिवासी लोकांचा झपाटयाने विकास करण्याच्या दृष्टीने आदिवासी क्षेत्रामध्ये दळणवळण सुविधा अत्यंत महत्वाची व आवश्यक आहे. योग्य रस्ते नसल्यामुळे आदिवासी लोकांना आरोग्य केंद्र, बाजार केंद्र, शैक्षणिक केंद्र इत्यादी आवश्यक सेवांचा लाभ घेता येत नाही. दळणवळणासाठी रस्ते असल्यास पुढील गोष्टी उपलब्ध होतात.

  • प्राथमिक शिक्षणानंतरच्या शिक्षणाच्या सुविधा, आरोग्यविषयकय सुविधा आणि रोजगार सुविधा प्राप्त करुन घेतात येतात.
  • अत्यावश्यक वस्तु त्या भागामध्ये आणता येतात आणि स्थानिक उत्पादित वस्तु बाहेर विक्रीसाठी नेता येतात.
  • वेतनी रोजगार मिळतो आणि
  • लवकरात लवकर गाऱ्हाणी दूर करण्याच्या दृष्टीने शासनाशी थेट संपर्क साधता येतो आणि लोकांमधील जागृती वाढीस लागते.

2014-15 या वर्षासाठी रु.50046.08 लाख एवढ़या नियतव्ययाची तरतूद करण्यात आली आहे. हा नियतव्यय जिल्हा मार्ग, पोच रस्ते, आणि जोडरस्ते इ.साठी देण्यात आलेला आहे. तसेच

2014-15 या वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेमध्ये रस्तेविकास या उपविकास क्षेत्रासाठी पुढीलप्रमाणे नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

अ.क्र. बाब व्यय (रुपयेलाखांत)
  राज्यस्तरीययोजना 20000.00
  रस्ते (ग्रामविकासविभाग) 5000.00
  गृहपरिवहन 500.00
  जिल्हामार्ग (किमानगरजाकार्यक्रमाव्यतिरिक्त) 14414.20
  जिल्हामार्ग (किमानगरजाकार्यक्रम) 9238.31
  आदिवासीवस्त्यांसाठीजोडणारेरस्ते 209.98
  डोगराळक्षेत्रामध्येसाकव (फूटब्रिज) बांधणे 648.05
  आश्रशाळांनाजोडरस्ते 35.54
  प्राथमिकआरोग्यकेंद्रांना उपकेंंद्रानाजोडरस्ते 0.00
  एकूण 50046.08