पीक संवर्धन

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील)

उदि्दष्टे- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) या योजनेची मुख्य उदि्दष्टे

  1. जनजाती क्षेत्र उपयोजना व इतर क्षेत्र यामधील विकासाच्या प्रमाणातील फरक कमी करणे.
  2. आदिवासी लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे.
  3. आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे.

कृषी , पदुम विभाग, मंत्रालय मुंबई-32 यांचे कडील शासन निर्णय क्र. आ.ऊ.यो. 2416/प्र.क्र. 177/4-ए,दि. 09 ऑगस्ट 2017 व शासन निर्णय क्र. आ.उ.यो. 2417/प्र.क्र. 127/४ए दि. 30डिसेंबर 2017 अन्वये महाराष्र्टातील आदिवासी शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना ही राज्यातील मुंबई,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,सांगली व कोल्हापुर हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्हयांमध्ये राबविण्यात येत आहे.

या योजनेतंर्गत खालील घटकांसाठी अनुदान देण्यात येते.

अ.क्र. बाब अनुदानाची मर्यादा (रुपये)
1. नविन विहीर 2,50,000/-
2. जुनी विहीर दुरुस्ती 50,000/-
3. इनवेल बोअरींग 20,000/-
4. वीज जोडणी आकार 10,000/-
5. शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण 1,00,000/-
6. परस बाग 500/-
7. विजपंप/तेलपंप 20,000/-
8. एचडीपीई/पीव्हीसी पाईप 30,000/-
9. सुक्ष्म सिंचन संच अ. ठिबक सिंचन आ. तुषार सिंचन 50,000/- 25,000/-