आश्रमशाळा

  • आश्रमशाळा समुहयोजनेचा उद्देश-राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणा-या जनतेची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्र विकासाचा दृष्टीकोन स्वीकारण्यात  आला. अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा असावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.                                                                                                                                                                                      
  • आश्रमशाळा मंजुरी निकष लोकसंख्या- डोंगराळ भागात 5000 ते 7000 आदिवासी लोकवस्तीसाठी एक आश्रमशाळा आणि दुर्गम भागात 2000 ते 3000 लोकवस्तीसाठी एक आश्रमशाळा मंजूर करण्यात येते.                                                                                                                                                                 
  • आश्रमशाळांची संख्या- आदिवासी विकास विभागांतर्गत एकूण 552 शासकीय आश्रमशाळा मंजूर आहेत.त्यापैकी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील 412 तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील 140 शासकीय आश्रमशाळा आहेत. तथापि मंजूर पैकी 529 आश्रमशाळा कार्यरत आहेत                                                                        
  • 529 शासकीय आश्रमशाळांपैकी 11 इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून, 25 कन्या शाळा आहेत.                                                                                                                    
  • विद्द्यार्थी संख्या- सदर शासकीय आश्रमशाळांमध्ये सन 2016-17 मध्ये एकूण 187392 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 94588 मुले तर 98804 मुली आहेत.              
  • विद्द्यार्थ्याना पुरविण्यात येणा-या सोईसुविधा-  शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नधान्य, मसाले, किराणामाल, दुध अंडी, केळी, फळे, शालेय गणवेश, खोबरेल तेल, आंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण, टुथपेस्ट, टुथब्रश, सॅनेटरी नॅपकिन (मुलींसाठी), बुट, पायमोजे, रेनकोट, शालेय शैक्षणिक साहित्य ( पाठयपुस्तके, व लेखन सामुग्री) पुरविण्यात आलेली आहेत आहार, कपडे, शालेय व इतर साहित्य शासना मार्फ़त पुरविण्यात येते.खरेदीसाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमीत केले असून अलिकडे दि.10.03.2016 च्या शासन निर्णयान्वये सर्वसमावेशक सूचना देण्यात आलेल्या आहेत.त्यात खरेदीबाबत सविस्तर कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली असून 4 समित्यांमार्फत खरेदी करण्याची तरतुद करण्यात आलेली आहे.                                                                                                                                                    
  • शाळा व्यवस्थापन समिती :- आश्रमशाळांमधील दैनंदिन व्यवस्थापन व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच त्यावर संनियत्रण ठेवण्यासाठी आश्रमशाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली असून सदर समित्यांमध्ये अध्यक्षासहीत 75 टक्के सदस्य पालकांमधून निवडले आहेत. सदर शाळा व्यवस्थापन समित्यांना आश्रमशाळांच्या किरकोळ दुरूस्त्यांसाठी रू.1.00 लक्ष पर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                               स्वतंत्र बांधकाम कक्ष व आश्रमशाळांचे बांधकाम
  • आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा/वसतीगृह बांधकाम बांधकाम विभागामार्फत करण्यात येत होते. मात्र शासन निर्णय दि. 14/7/2016 अन्वये शासकीय आश्रमशाळा/वसतीगृह बांधकाम, देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र बांधकाम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.शासकीय आश्रमशाळा/वसतीगृह बांधकामासाठी दि.2.01.2007 अन्वये सुधारीत आराखडा मंजूर करण्यात आलेला असून त्यानुसार बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात येते. एकुण 527 शासकीय आश्रमशाळांना जमीन प्राप्त असुन 25 आश्रमशाळांना जमीन अप्राप्त आहे. सद्यस्थितीत खालीलप्रमाणे शासकीय आश्रमशाळांचे इमारत बांधकाम पुर्ण झाले आहे.
  • अ.क्र.

    तपशिल

    संख्या

    1

    जुन्या टाईप प्लॅनप्रमाणे

    277

    2

    नविन टाईप प्लॅनप्रमाणे -

    शालेय इमारत

    141

    मुलांचे वसतीगृह

    71

    मुलींचे वसतीगृह

    114

    बहुउद्देशीय हॉल

    137

  • सद्यस्थितीत 154 शासकीय आश्रमशाळांची बांधकामे सुरू आहेत.                                                                                                                                                                                                                                                                                 

    आश्रमशाळेतील किशोरवयीन विद्यार्थी व शिक्षक यांना राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण मिशन यांच्यातर्फे जीवन कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याबाबत.

  • आश्रमशाळेतील विद्यार्थ्यामध्ये आरोग्य विषयक अनेक समस्या असल्याने त्यांना आरोग्य, पोषणपाणी,स्वच्छताहायजिन  जीवन कौशल्याबाबत याबाबींचे प्रशिक्षण देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे युनिसेफ यांनी सुचविलेले आहे.
  • शासकीय आश्रमशाळांमधील आणि एकलव्य निवासी शाळांमधील किशोरवयीन विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासंदर्भातचा प्रस्ताव राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण मिशन यांनी आयुक्त, आदिवासी विकासनाशिक यांना  दि. 23 मार्च2016 रोजी सादर केला हेाता.
  • शासकीय आश्रमशाळांमधील व एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना किशोरवयीन प्रशिक्षण देण्यासंदर्भातचा प्रस्ताव आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी दि.4.8.206 च्या पत्रान्वये शासनास सादर केला होता.
  • सदर प्रस्तावास शासनाची मान्यता प्राप्त होऊन सदर प्रशिक्षण  यशदा प्रमाणे राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण मिशन ही संस्था राज्य शासनाचीच असल्यामुळे सदर संस्थेमार्फत देण्याबाबत  रु.231.18 लक्ष च्या खर्चास दि.10/1/2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
  • या प्रशिक्षणांतर्गत आरोग्य, पोषण, पाणी, स्वच्छता, हायजिन व जीवन कौशल्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 30 राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि स्वयंसेवी संस्थामधील व्यक्ती यांच्यामधून निवडण्यात येणार आहेत. या मास्टर ट्रेनरना पाच दिवसाचे  आरोग्य, पोषण,पाणी, स्वच्छता, हायजिन व जीवन कौशल्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  सदरचे प्रशिक्षण नागपूर येथील आरोग्य विभागाच्या संस्थेमध्ये देण्यात येईल.
  • सदर मास्टर ट्रेनरकडून प्रत्येक आश्रमशाळेतून व एकलव्य निवासी शाळेमधून निवडलेल्या सहा कर्मचाऱ्यांना (पुरुष अधिक्षकस्त्री अधिक्षिका,प्रत्येकी दोन पुरुष  महिला शिक्षकप्रशिक्षण देण्यात येणार आहेसदरचे प्रशिक्षण तीन टप्प्यामध्ये प्रत्येक वेळी दोन दिवस याप्रमाणे देण्यात  येणार आहे.                                              
  • सदर प्रशिक्षण दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून आश्रमशाळेतील व एकलव्य निवासी शाळेतील उर्वरित शिक्षक व 6 वी ते 12 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  प्रत्येक टप्प्याचे प्रशिक्षण 10 आठवडयामध्ये देण्यात येणार आहे. याप्रमाणे पहिला टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा,दुसरा टप्पा संपल्यानंतर  तिसरा टप्पा या प्रमाणे शिक्षण देण्यात येणार आहे.
  • सदरच्या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळेतील प्रत्येकी सहा याप्रमाणे निवडलेल्या 3258 प्रशिक्षणार्थी 109 बॅचेसमध्ये एका तिमाहीमध्ये एका टप्प्याचे प्रशिक्षण देण्यासाठी रु.77.06 लाख खर्च येणार आहेसबब, तीन टप्प्यामध्ये सदरचे प्रशिक्षण देण्यासाठी एकूण  रु.231.18 लक्ष खर्च येणार आहे.                                                                                            

                                                        उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये विशेष मोहिम राबवून शासकीय/ अनुदानित आश्रमशाळांची व शासकीय वसतीगृहांच्या दुरुस्तीची कामे  करणेबाबत.

  • शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वंगीण विकास व शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आश्रमशाळांची व वसतीगृहांची दुरुस्ती करणेबाबत विविध आढावा बैठकांमध्ये प्रकल्प अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच शासकीय आश्रमशाळांची किरकोळ दुरुस्ती वेळेवर व्हावी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीस निधीही उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन हा महत्वकांक्षी कार्यक्रम सूरू केला असून त्याअंतर्गत "स्वच्छ भारत: स्वच्छ शाळा" हा कार्यक्रमही सुरू केला आहे. यासाठी आदिवासी विकास  विभागाने   दि.11.3.2015 च्या शासन निर्णयान्वये आश्रमशाळांमध्ये वॉश कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने   सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीनंतर आश्रमशाळांमधील शालेय व वसतीगृह इमारत, शौचालये व स्ननगृहे, स्वयंपाकगृह, भोजनकक्ष व कोठीगृह, आश्रमशाळेची पाणी पुरवठा योजना, विद्युत पुरवठा, संपूर्ण संरक्षण भिंत, अन्न-धान्याची स्वच्छता, बेडींगची धुलाई इ. साठी दि.१2 एप्रिल 2017  ते 15 मे, २०१७ या कालावधीत प्रत्येक आश्रमशाळेमध्ये विशेष मोहिम शासन परीपत्रक दि.07 एप्रिल 2017 अन्वये राबविण्यात येत आहे. 
  • आश्रमशाळा व वसतीगृह दुरुस्ती मोहिम राबविण्यासाठी खालीलप्रमाणे शाळास्तरावर उपलब्ध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
  1. शालेय /वसतीगृह इमारत दुरुस्ती समिती- इमारतीचे छत व भिंत, फरशी दुरुस्ती, दरवाजे, खिडक्या दुरुस्ती, संरक्षक भिंत, शौचालये व स्नानगृहे दुरुस्ती, स्वयंपाकगृह, कोठीगृह, भोजनगृह दुरुस्ती, आवश्यक ती रंगरंगोटीची कामे, मुला/मुलींचे धोबीघाट दुरुस्ती इत्यादी संलग्न कामे करणे.
  2. आश्रमशाळा पाणी पुरवठा समितीशालेय  इमारत /वसतीगृह इमारतीमधील पाणीपुरवठा, स्नानगृहे, हॅण्डवॉश स्टेशन , शौचालयासह सर्व नळ दुरुस्ती, पाण्याची टाकी दुरुस्ती, पाईप दुरुस्ती, विद्युत मोटर, केबल दुरुस्ती, स्वयंपाकगृह, कोठीगृह, भोजनगृह यामधील नळ दुरुस्ती इत्यादी संलग्न कामे करणे.
  3. शालेय व वसतीगृह विद्युत पुरवठा समितीशालेय इमारत /वसतीगृहातील प्रत्येक खोलीतील विद्युत वायरिंग, बोर्ड होल्डर इत्यादीसह दुरुस्ती, फॅन, टयुब, एलईडी बल्ब बदलने व दुरूस्ती, स्नानगृहे व शौचालयामधील विद्युत पुरवठा व दुरुस्ती, पथदिवे दुरुस्ती, स्वयंपाकगृह, कोठीगृह, भोजनगृहातील विद्युत दुरुस्ती इत्यादी संलग्न कामे.
  4. अन्न-धान्य स्वच्छता, फर्निचर दुरूस्ती,भांडारगृह व बेडींग स्वच्छता - आश्रमशाळा कोठीगृहातील अन्न-धान्य व किराणा मालाची स्वच्छता सुट्टीनंतरच्या पहिल्या व शाळा सुरु होण्याच्या अगोदर दोन दिवस करणे, तसेच वसतीगृहातील भांडारकक्षातील सर्व मालाची वस्तूंची तपासणी करून आवश्यक वस्तू वापरात आणणे, आवश्यकतेपेक्षा जास्त असलेल्या वस्तू प्रकल्प अधिका-यांच्या मान्यतेने आवश्यक त्या शाळेवर पाठविणे, वापरात नसलेल्या वस्तूंचे निर्लेखन करणे,आश्रमशाळेतील सर्व फर्निचर दुरुस्ती, चादर, सतरंजी, बेडशीटी, ब्लॅकेट धुणे इत्यादी संलग्न कामे करणे.
  5. परिसर स्वच्छता, वृक्ष संवर्धन/संगोपन समिती- आश्रमशालेय आवारातील सर्व परिसराची शाळा सुरु होण्यापूर्वी संपूर्ण स्वच्छता करणे, खाचखळगे बुजवणे, जमिनीचे सपाटीकरण, गवत काढणे, सांडपाण्याची व्यवस्था करणेसर्व प्रकारची वृक्ष लागवडी संदर्भातील वृक्षांचे संवर्धन व संगोपन करणेसह सलग्न कामे.
  6. शासकीय वसतीगृह दुरूस्ती - इमारतीचे छत व भिंत, फरशी दुरुस्ती, दरवाजे, खिडक्या दुरुस्ती, संरक्षक भिंत, शौचालये व स्नानगृहे दुरुस्ती, स्वयंपाकगृह, भोजनगृह दुरुस्ती, आवश्यक ती रंगरंगोटीची कामे,वसतीगृह इमारतीमधील पाणीपुरवठा, स्नानगृहे, शौचालयासह सर्व नळ दुरुस्ती, पाण्याची टाकी दुरुस्ती, पाईप दुरुस्ती, विद्युत मोटर, केबल दुरुस्ती, वसतीगृहातील प्रत्येक खोलीतील विद्युत वायरिंग, बोर्ड होल्डर इत्यादीसह दुरुस्ती, फॅन, टयुब, एलईडी बल्ब बदलने व दुरूस्ती, स्नानगृहे व शौचालयामधील विद्युत पुरवठा व दुरुस्ती,  स्वयंपाकगृह,, भोजनगृहातील विद्युत दुरुस्ती,वसतीगृह परिसर स्वच्छता करणे,  सर्व प्रकारची वृक्ष लागवडी संदर्भातील वृक्षांचे संवर्धन व संगोपन करणेसह सलग्न कामे.
  • वरीलप्रमाणे आश्रमशाळानिहाय व वसतीगृह समित्यांची नियुक्ती ही सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी कार्यरत राहणार असून त्यांचेवर नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधित समित्यांनी वरीलप्रमाणे विशेष मोहिमेद्वारे दुरुस्तीची  व देखभालीची कामे करुन घ्यावीत. तसेच वर्षभर सुस्थितीत राहण्यासाठी आवश्यकते प्रमाणे वेळोवेळी देखभालीची-दुरुस्तीची कामे करुन घेण्यात यावीत. आश्रमशाळेतील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे समित्यांमध्ये समाविष्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.   
तंत्रशिक्षण