परिवहन व दळणवळण

रस्ते व पुल बांधकाम (लेखाशिर्ष 5054 5117)

  1. आदिवासी विभागामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत लेखाशिर्ष 5054 5117 (राज्यस्तर योजना) अंतर्गत रस्त्यांची कामे घेण्यात येतात. सदर कामांना राज्यस्तरावरुन प्रशासकीय मान्यता देऊन त्या कामांचा समावेश "अर्थसंकल्पविषयक निवेदने नवीन बाबी" मध्ये करण्यात येतो. तसेच, राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रगतीपथावरील कामांचा समावेश विभागाच्या अर्थसंकल्पीय अंदाज भाग-3 मधील परिशिष्ट ‘ड’ मध्ये करण्यात येतो. सदर रस्त्यांच्या कामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते.

रस्ते व पुल दुरुस्ती (लेखाशिर्ष 3054 2722)

  1. आदिवासी विभागामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत लेखाशिर्ष 3054 2722 (राज्यस्तर योजना) रस्ते व पुलांच्या दुरुस्ती/सुधारणेची कामे घेण्यात येतात. सदर कामांना जिल्हा परिषदेमार्फत प्रशासकीय मान्यता देऊन त्या कामांना राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सदर कामांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते