शाळा व्यवस्थापन समिती

शाळा व्र्यवस्थापन समिती

शाळा व्र्यवस्थापनसमिती

  1. आश्रमशाळांमधील दैनंदिन व्यवस्थापन व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच त्यावर संनियत्रण ठेवण्यासाठी आश्रमशाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांची दि.29/7/2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापना करण्यात आली.
  2. सदर समिती किमान 12 ते 16 लोकांची राहील. (सदस्य सचिव वगळून)
  3. अध्यक्षासहीत 75 टक्के सदस्य विद्यार्थ्यांचे आईवडील/पालकांमधून निवडले आहेत. सदर सदस्यांपैकी 50 % सदस्य महिला राहतील.
  4. समितीचे कार्ये :- बालकांचा हक्क तसेच राज्य शासन, स्थानक प्राधिकरण, शाळा, माता, पिता आणि पालक यांची कर्तव्ये याविषयी परिसरातील जनतेला सोप्या व कल्पक मार्गाने माहिती देणे.
  5. अशैक्षणिक कर्तव्ये शिक्षकांवर लादली जात नाहीत याचे संनियंत्रण करणे.
  6. शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
  7. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
  8. शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
  9. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
  10. विद्यार्थ्यांच्या गैरहजर राहण्याच्या व गळतीच्या समस्यांवर उपाययोजना करणे.
  11. विद्यार्थी व पालकांची गाऱ्‍हाणी ऐकणे .
  12. कर्मचाऱ्‍यांच्या विनाकारण गैरहजर राहण्याच्या समस्यांवर उपाययोजना करणे.
  13. बालकांची 100 % पट नोंदणी करणे व 100 % उपस्थिती यामध्ये सातत्य राहील याची खातरजमा करणे.
  14. शाळा बाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाह आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
  15. आश्रमशाळा, वसतीगृह, कोठीगृह, स्वंयपाकगृह, भोजनकक्ष, सार्वजनिक हॉल, पाणी पुरवठा योजना, जलनि:सारण, विद्युत इत्यादीची किरकोळ दुरूस्ती करणे.
  16. शाळा परिसर सुशोभित करणे व स्वच्छता ठेवणे.

शाळा व्यवस्थापन समितीचे वित्तीय अधिकार : शाळा व्यवस्थापन समित्यांना किरकोळ दुरूस्त्यांसाठी रू.1.00 लक्ष पर्यंत निधी उपलब्ध करून आश्रमशाळांच्या देण्यात आला आहे.